Manoj Jarange on Tanaji Sawant : तानाजी सावंतांना पैशांची मस्ती, मनोज जरांगे नेमकं का भडकले?
Manoj Jarange on Tanaji Sawant : तानाजी सावंतांना पैशांची मस्ती, मनोज जरांगे नेमकं का भडकले?
मुंबई: आधी दिलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) ठाकरे सरकारला का टिकवता आलं नाही? दोन वर्षे शांत बसल्यानंतर हे वादळ अचानक का उठलं? असा प्रश्न राज्याचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना विचारला. त्यावर मनोज जरांगे यांनीही प्रत्युत्तर दिलं. गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर पैसे कमावलात, तुमच्या पैशाची मस्ती तुमच्याकडेच ठेवायची. आमचं आंदोलन शांततेत सुरू असून त्यांना कुठलं वादळ दिसलं असा सवालही जरांगे यांनी विचारला.
मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी पंचांग घेऊन बसलो नाही असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंतांनी केलं होतं. मराठा आरक्षणाचं वादळ अचानक का उठलं असा सवाल तानाजी सावंतांनी विचारला. तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला. तानाजी सावंतांना पैशाची मस्ती आली आहे. त्या जीवावर ते बोलत आहेत असं जरांगे म्हणाले.




















