(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : EWS, ECBC , कुणबी तीनही सुरू ठेवावं, मनोज जरांगेंची मागणी
Manoj Jarange : EWS, ECBC , कुणबी तीनही सुरू ठेवावं, मनोज जरांगेंची मागणी
जरांगेंचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण, सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही, मनोज जरांगेंची भूमिका.
Manoj Jarange: 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी चार-पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीकरण जुळले नाही तर पाडापाडी करावी लागेल असं म्हटलंय. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. यावेळी आपल्याला राज्यात मतदारसंघनिहाय तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.