Manda Mhatre Navi Mumbai: विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी चार्जशिट लवकर दाखल करा- म्हात्रे
Manda Mhatre Navi Mumbai: विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी चार्जशिट लवकर दाखल करा- म्हात्रे
कोपरखैरणे येथील नवविवाहित महिलेवर शिळफाटा भागात चार आरोपींनी सामूहिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली होती. पुजारी म्हणून वावरणार्या या चार आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींना अटक केली असली तरी ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर यांची चार्जशिट दाखल करण्याची मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट मंदा म्हात्रे यांनी ही मागणी केली आहे. नवी मुंबई शहरात गुन्हेगारी वाढली असून ती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस संख्याबळ वाढवण्यात यावे अशाही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.























