एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Malad Fire : मालाडच्या पठाणवाडीत आगीचा भडका, दाटीवाटीच्या वस्तीतील अनेक गाळे जळून खाक!
मुंबईतील मालाड पूर्व भागातील पिंपरीपाडा परिसरातील पठाणवाडी येथे एका लाकडी सामानाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या आगीत सुमारे पंधरा ते वीस गाळे जळून खाक झाले आहेत. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असून अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास आणि मदतकार्यात अडथळे येत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















