Majha Samvad : मी कोणत्याही चौकशीच्या ससेमीराला घाबरत नाही : रोहित पवार Rohit Pawar
एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 14व्या वर्षांच्या प्रवासात तुमची साथ आमच्यासाठी अमुल्य आहे. 14 वर्षांच्या प्रवासात ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांना प्रेक्षकांनीही साथ दिली. हा 14 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, पण तो केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी माझा संवाद या विशेष मालिकेत.दिवसभर मंथन करणार आहोत.
माझा संवाद या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधला त्यांनी अनेक गोष्टींवर आपलं परखड मतं मांडली.
मी कोणत्याही चौकशीच्या ससेमीराला घाबरत नाही. मी कधीही फडणवीस किंवा मोदींविरोधात बोलत नाही. मी बोलतो ते त्यांच्या धोरणांविरोधात बोलत असतो, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी मांडलं.