एक्स्प्लोर
Anti-Conversion Law | राज्यात 'धर्मांतरण' रोखण्यासाठी कठोर कायदा येणार!
राज्यात फसवणूक, दबाव किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा घटना कायद्याला मान्य नाहीत. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, ज्यात फसवणूक करून किंवा जबरदस्तीने धर्मांतरण केले जात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे. हा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, राज्य शासन त्याचा अभ्यास करणार आहे. या अभ्यासानंतर जबरदस्तीने, आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचेही धर्मांतरण करता येणार नाही, अशा प्रकारच्या कठोर तरतुदी कायद्यात करण्यात येतील. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गरिबीचा फायदा घेऊन लोकांना आमिष दाखवून धर्मांतरण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पंडिता रमाबाई मिशनसारख्या संस्थांमध्ये मुलींना जबरदस्तीने ख्रिश्चन करणे, मारहाण करणे असे प्रकार घडत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. संविधानाने स्वेच्छेने धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी, 'गरिबीचा फायदा घ्यायचा आणि अमिष दाखवून धर्मबदल करायला लावायचा, सेवा सुश्रूषा करतो आहे असं दाखवून धर्म बदलायला लावायचा, आम्ही काहीतरी तुम्हाला अधिकचं शिक्षण देतो पण तुम्ही धर्म बदला अशा प्रकारचं प्रलोभन देऊन धर्म बदलायला लावायचा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याला मान्य नाहीत.' अशा घटना टाळण्यासाठी राज्य सरकार कठोर तरतुदी करण्याच्या मानसिकतेत आहे आणि लवकरच यावर निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















