Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : महाराष्ट्र सुपरफास्ट : 12 June 2024
सोलापुरात मागच्या आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. लिमयेवाडी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. मागच्या चार दिवसांपासून रात्र काढतायत जागून.
छत्रपती संभाजीनगरच्या कचनेरमध्ये मुसळधार पाऊस, पहिल्याच पावसात धारेश्वर महादेव मंदिराजवळील धबधबा प्रवाहित, यावेळी धबधबा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी.
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हा गावात शरद पवारांकडून चारा छावण्यांची पाहणी.
साताऱ्यात म्हसवड इथे वास्तुशांतीच्या जेवणातून १२५ जणांना विषबाधा, जेवणानंतर मळमळ, जुलाब, उलट्यांचा त्रास, सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर.
पुण्याच्या चाकणमध्ये विजेचा शॉक लागून आई आणि १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, खराबवाडी परिसरातील घटना, परिसरात हळहळ व्यक्त.
पावसामुळे पडलेल्या सांगलीतील ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी जिल्ह्यातील गावागावात लावली जाणार. फांद्या छाटून वटवृक्ष तिथेच उभा करून ऐतिहासिक वटवृक्षाचं जतन केलं जाणार.
पुण्याच्या चाकणमध्ये विजेचा शॉक लागून आई आणि १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, खराबवाडी परिसरातील घटना, परिसरात हळहळ व्यक्त.