Maharashtra Delta Plus : राज्यात डेल्टा प्लसचा वाढता संसर्ग, आतापर्यंत 76 रुग्णांची नोंद ABP Majha
राज्यातली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लसच्या व्हेरियंटनं डोकं वर काढलंय.. आणि यात चिंताजनक बाब म्हणजे लस घेतलेल्यांनाही डेल्टाची लागण होतेय. राज्यात डेल्टा प्लसचे ७६ रुग्णांची नोंद झालीए..आणि त्यातल्या लस घेतलेल्या १८ जणांनाही लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे... आतापर्यंत ५ डेल्टा प्लसच्या रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता या डेल्टा प्लसचा संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे.. रत्नागिरी, जळगाव आणि कोल्हापुरात डेल्टा प्लसचे आकडे वाढतायत. कोल्हापुरात आकडा वाढताना दिसतोय. राज्यात निर्बंध शिथिल होतायत. अशात डेल्टा प्लसच्या वाढत्या संसर्गानं अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त होतेय.






















