Numerology : मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत
Numerology : अंकशास्त्रात, मूलांकाच्या मदतीने भविष्याशी संबंधित गोष्टी सांगता येतात. या ठिकाणी आपण मार्चचा तिसरा आठवा मूलांक 1 ते 9 साठी नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.

Numerology : प्रत्येक आठवडा काहीना काहीतरी नवीन गोष्टी, संकल्प घेऊन येतो. त्यामुळे आपले नवीन आठवड्याचे पुढचे 7 दिवस कसे असतील. याची देखील अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. अंकशास्त्रात (Ank Shastra), मूलांकाच्या मदतीने भविष्याशी संबंधित गोष्टी सांगता येतात. या ठिकाणी आपण मार्चचा तिसरा आठवा मूलांक 1 ते 9 साठी नेमका कसा असणार आहे ते जाणून घेणार आहोत.
मूलांक 1 (Mulank 1)
मूलांक 1 असणाऱ्या लोकांनी नवीन आठवड्यात कोणाताही इगो किंवा अहंकार मनात ठेवू नये. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच, तुमच्यात आत्मविश्वास असूद्या मात्र अंधविश्वास फार घातक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत योग्य काळजी घ्या. तसेच, घरातील वातावरण चांगलं ठेवा.
मूलांक 2 (Mulank 2)
मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला न मागता सिनिअर्सकडून पाठिंबा मिळेल. यामुळे तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल.
मूलांक 3 (Mulank 3)
मूलांक 3 साठी हा आठवडा करिअरमधील ग्रोथसाठी फार चांगला असणार आहे. विशेषत: मिडिया, शिक्षण आणि काऊंन्सिलिंगशी संबंधित क्षेत्रातील लोकांना याचा लाभ घेता येईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. सकारात्मक गोष्टी तुमच्या बाजूने घडतील.
मूलांक 4 (Mulank 4)
मूलांक 4 असणाऱ्या लोकांना करिअरशी संबंधित शुभवार्ता मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बॉसकडून प्रमोशनसाठी तुमचं नाव पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते. या आठवड्यात पैशांची कोणतीही गुंतवणूक करु नका.
मूलांक 5 (Mulank 5)
या मूलांकाच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मुलाखतीसाठी फोन येऊ शकतो. तसेच, तुम्हाला ऑफर लेटर देखील मिळू शकतं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल.
मूलांक 6 (Mulank 6)
या जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन आठवडा मिश्रित फलदायी असणार आहे. या काळात करिअरमध्ये तुम्हाला लाभ मिळेल. उत्पन्न देखील चांगलं असेल. मात्र, पैशांचा वापर करताना जपून वापर करा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे.
मूलांक 7 (Mulank 7)
मूलांक 7 असणाऱ्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या कालावधीत तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. या काळात नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे.
मूलांक 8 (Mulank 8)
या मूलांकाच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागेल. तुमचे पैसेदेखील खर्च होऊ शकतात. तसेच, महिलांना सांधेदुखीच्या संदर्भात काही त्रासही होऊ शकतो.
मूलांक 9 (Mulank 9)
मूलांक 9 साठी मार्चचा तिसरा आठवडा सावधानतेचा असणार आहे. या कालावधीत तुमची रखडलेली कामे सुधारतील. तसेच, तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Chaturgrahi Yog 2026 : मीन राशीत होतंय 4 ग्रहांचं 'महामिलन'; 18 मार्चपासून राशींचा सुवर्णकाळ सुरु, हातात खेळणार पैसाच पैसा



















