एक्स्प्लोर
ABP Majha Headlines : 04 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 19 AUG 2025 : ABP Majha
राज्यात अतिवृष्टीमुळे बारा ते चौदा लाख एकरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईत सततच्या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा ठप्प झाली, तर पश्चिम रेल्वेची वसई ते विरार वाहतूक बंद पडली. बीकेसी मेट्रोमध्ये पुन्हा एकदा गळती झाली असून, मेट्रो स्थानकांमध्येही पाणी साचले आहे. पावसामुळे मुंबईकरांची दैना झाली. एलबीएस मार्गावर गुडघाभर पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांना त्रास झाला. पवईच्या फुलेनगर भागात पुराच्या पाण्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला. मिठी नदी धोक्याच्या पातळीकडे वाहत असून, क्रांतीनगर कुर्ला भागातील तीनशे पन्नास नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ठाण्यातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात सापांचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पावसामुळे राज्याच्या शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचा चिखल झाला असून, अनेक जनावरांना जलसमाधी मिळाली आहे. लेंडी प्रकल्प क्षेत्रातील पूरस्थितीची चौकशी होणार असून, नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. पूरस्थितीचे कारण लवकरच समोर येईल. ढगफुटीसदृश पावसात पाच जणांचा मृत्यू झाला. मुखेडमध्ये आमदार उशिरा आल्याने स्थानिकांनी "आपत्तीच्या वेळेला कुठे होतात?" असा सवाल करत संताप व्यक्त केला. ठाण्यातील गणपती कारखान्यात पाणी साचल्याने गणेश मूर्तींचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा





















