एक्स्प्लोर
Maharashtra Rains | राज्यात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर; Yavatmal मध्ये दोघांचा मृत्यू
महाराष्ट्रावर वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी चांगल्याच बरसत आहेत. पण काही जिल्ह्यांमध्ये बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्यातील पावसाच्या हालचालींचा विशेष अहवाल. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. गेल्या सतरा दिवसांपासून गोदावरीला पूर असूनही गोदा तीरावरची महाआरती संपन्न झाली. कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. वैतरणा आणि पिंजाळ या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात मदतीसाठी एक एनडीआरएफची टीमही दाखल झाली आहे. पालघर जिल्ह्यासाठी काल रात्रीपासून सकाळपर्यंत रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने सर्व शाळांना सुट्टी सुद्धा दिली होती. अहिल्यनगरमधील भंडारदरा आणि लेवंडे धरण परिसरातही मुसळधार पाऊस झाला. प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपुरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा खळखळून वाहत आहे. भंडाऱ्यातही पावसाचा जोर कायम आहे. गोसेखुर्द धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोंदियातही पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. साताऱ्यातही मुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णा नद्या पात्र सोडून वाहत आहेत. कोयना धरणातूनही विसर्ग सुरू केल्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















