Maharashtra Rain Superfast News: तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 28 जुलै 2024: ABP Majha
गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून पाण्याचा विसर्ग वाढवण्य़ात आलाय. गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे पुन्हा उघडण्यात आलेत.. यात ७ दरवाजे १ मीटरने तर २६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आलेत.. धरणातून एकूण दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. दरम्यान आज भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून नदीकाठावरील ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील पूरपरिस्थिती सामान्य झालीय. मात्र भामरागडच्या पार्लकोटा नदीच्या पातळीत वाढ झालीय. तर पुराचे पाणी शहरात शिरल्याने घरे आणि दुकाने पाण्याखाली आलेत.
राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे काल संध्याकाळी बंद झालेत..तसंच अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग सव्वातीन लाख क्युसेकने करण्यात आलाय.. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी एक इंचाने कमी झाली असून पावसाचा जोर देखील काहीसा कमी आहे... त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय... सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 7 इंच इतकी आहे...
पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने विसर्ग होणार
सांगलीच्या चांदोली धरणातून सध्या १६ हजार ३८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाज्यातून बाहेर पडणारं पाणी नदीपात्रात जाऊन मिळतंय. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाने काहीशी उसंत घेतली. मात्र चांदोली धरणातून सुरु असलेल्या १६ हजार ३८५ क्यूसेकने प्रतिसेकंद विसर्गामुळे वारणा व मोरणा दीकाठावरील २१ गावांना फटका बसला आहे.