एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Maharashtra MLC Election | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या चौघांनी उमेदवारी अर्ज भरला
विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















