एक्स्प्लोर
Hydro Ganja: राज्यात Hydro Ganja चा विळखा, चिचकर रॅकेट, नेमकं प्रकरण काय?
विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या फैलावावर सविस्तर चर्चा झाली. राज्यासमोर हायड्रो गांजाच्या फैलावाचे मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवीन जिचकर नावाच्या व्यक्तीने ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली आणि तो थायलंड व अमेरिकेतून कुरियरद्वारे भारतात पाठवत होता. या तस्करीत पोस्टाचे कर्मचारी आणि पोलिसांचाही सहभाग आढळून आला आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीतील काही पोलिसांना निलंबित करण्यात आले असून काहींवर बडतर्फीची कारवाई झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तस्करीत शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांचाही वापर झाल्याचे समोर आले आहे, कारण त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. केवळ तस्करच नव्हे, तर पुढील लिंक शोधणेही अनिवार्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. "केवळ तस्कर नाहीतर पुढील लिंक शोधणेही अनिवार्य असल्याचं फडणवीस म्हणाले." पाच दिवसांपूर्वी गुप्तचर माहितीच्या आधारे दोन इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे २१ किलो हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत २१ कोटी ५५ लाख रुपये आहे. अंमली पदार्थांच्या गुन्हेगारांना केवळ एनडीपीएस कायद्यांतर्गत नव्हे, तर मकोका (MCOCA) अंतर्गत अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी या अधिवेशनात कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे.
महाराष्ट्र
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















