Maharashtra Unlock : लोकलच्या गर्दीवर नियंत्रणासाठी अॅपचा विचार, लोकल, हॉटेलबाबत आठवड्याभरात निर्णय
गेल्या काही दिवसांपासून मुंबईची लोकल सुरु करण्यासाठी नागरिकांपासून ते राजकीय पुढाऱ्यांपर्यंत अनेक आंदोलनं झाली. पण आता दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीय. तर याबाबतच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अॅप तयार करण्याची शक्यता आहे. ज्या अॅपमार्फत मुंबई लोकलमधील गर्दीवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे. तर संध्याकाळी चारनंतर हॉटेल सुरु करण्याबाबतचा निर्णय देखील पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. असंही मुख्यमंत्र्यांना म्हटलंय. कोरोना परतणार नाही याची खबरदारी घेत लोकलबाबत आणि हॉटेलबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.





















