Maharashtra Corona : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, आजचा आकडा 26 हजार 538
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 26 हजार 538 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 25 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज 144 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 144 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 797 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 330 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.




















