Kolhapur:आंतरजातीय विवाह केल्यानं बहिणीसह तिच्या पतीची भावांकडून हत्या, कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा
Maharashtra Kolhapur Crime News : सैराट चित्रपटातील (Sairat Movie) कहाणीप्रमाणे आंतरजातीय विवाह केलेल्या बहीण (Sister) आणि तिच्या पतीची हत्या करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना कोल्हापुरातील न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा (Punishment of life imprisonment) सुनावली आहे. पन्हाळा तालुक्यातल्या (Panhala Taluka) मेघा पाटील हिने प्रियकराबरोबर आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) केला होता. या लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. लग्नानंतर कसबा बावडा (Kasaba Bawada) इथं राहणाऱ्या मेघा आणि तिच्या पतीची तिच्या सख्ख्या भावांनी हत्या केली होती. 2015 साली या घटनेच्या आधी सैराट चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे कोल्हापुरातील ऑनर किलिंगच्या या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती.























