Sanjay Raut यांच्यावरील ईडी कारवाईबाबत काय म्हणाले Kirit Somaiya ABP Majha
Kirit Somaiya On ED Raids : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी गैरव्यवहार समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी संजय राऊत यांची धडपड सुरू होती. मात्र, आता या प्रकरणात आणखी कारवाई होणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील पैसे प्रवीण राऊत, संजय राऊत आणि वर्षा राऊत यांनी वापरले असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. या कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, ईडी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.



















