एक्स्प्लोर
Karuna Munde : धनंजय मुंडेंवर मेहुणीशी गैरकृत्य, आईला मरणास प्रवृत्त केल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पुन्हा एकदा कौटुंबिक आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांची पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 'स्वतःच्या बायकोला जे न्याय देऊ शकत नाही, ते समाजाला काय न्याय देणार?', असा सवाल करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी दावा केला की, २००५ मध्ये त्या आणि त्यांची बहीण एकाच वेळी गर्भवती असताना धनंजय मुंडे यांनी मेहुणीसोबत गैरकृत्य केले. एवढेच नाही, तर या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी आई पोलिसांकडे जाणार होत्या, मात्र धनंजय मुंडे यांच्या दबावामुळे आईने आत्महत्या केली, असा खळबळजनक आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे. वाल्मिक कराड प्रकरण आणि आजारपणामुळे राजकारणातून काहीसे दूर असलेले धनंजय मुंडे ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय झाले असतानाच हे आरोप झाले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















