Jayant Patil on Sharad Pawar: पवारांचा फोन, जयंत पाटलांचा दावा आणि रंगली चर्चा
Jayant Patil on Sharad Pawar: पवारांचा फोन, जयंत पाटलांचा दावा आणि रंगली चर्चा दिल्लीत या महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते अशी माहिती शरद पवारांनी फोनवरुन दिल्याचं शेकापच्या जयंत पाटलांनी म्हटलंय. दिल्लीत सत्तांतर करा आणि मग इकडे या अशा शुभेच्छा आपण पवारांना दिल्याचंही जयंत पाटलांनी म्हटलंय. आणि काहीच वेळाने जयंत पाटलांनी आपले शब्द फिरवले.. केंद्रात सत्ता बदल गणपती नंतर होईल ..ही माहिती माझ्या सूत्रांनी दिली शरद पवारांनी नाही असंही ते म्हणाले.. राहुल गांधी हा चमत्कार घडवून या सरकारचा गणपती बुडवतील असं विधान जयंत पाटलांनी केलंय. यावरुन राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात.. दिल्लीत महिनाभरात राजकीय उलथापालथ होणार, पवारांची माहिती - जयंत पाटील काहीच वेळात जयंत पाटलांनी शब्द फिरवले गणपतीनंतर सत्तांतर होईल, राहुल गांधी या सरकारचा गणपती बुडवतील- जयंत पाटील





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
