एक्स्प्लोर

Jalna Maratha Protest : धुळे-सोलापूर महामार्गावर मराठा बांधवांच्या रास्तारोकोमुळे वाहतूक कोंडी

Jalna Maratha Protest : धुळे-सोलापूर महामार्गावर मराठा बांधवांच्या रास्तारोकोमुळे वाहतूक कोंडी

जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती आहे. त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठवाड्याती अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत आज मराठा आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

मराठा आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्ग रास्ता रोको आंदोलन केलं. महामार्गावरील रामगव्हाण फाटा येथे हे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी शेकडो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने सोलापूर-धुळे महामार्गावर ट्राफिक जाम झाली आहे. 

संभाजीराजेंनी घेतली जरांगेंची भेट

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून त्यांची तब्येत खालावल्याची माहिती आहे. संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी संभाजीराजेंनी सरकारसह विरोधकांवर हल्लाबोल केला. मनोज जरांगेंना काही झाल्यास सरकार आणि विरोधक दोघेही जबाबदार असतील असं संभाजीराजे म्हणाले.यावेळी बोलताना त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या ओबीसींच्या आंदोलनावरही टीका केलीय. एकाच गावात दोन आंदोलन करणं ही आपली संस्कृती नसल्याचं संभाजीराजे म्हणाले.

नांदेड बंदला गालबोट, पोलिसांचा विनाकारण लाठीचार्ज

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या नांदेड बंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने चार ते पाच जण जखमी झाले. 

जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सोमवारी नांदेड बंद पुकारण्यात आला. नांदेड शहरातील शिवाजी पुतळा येथे सकल मराठा बांधव जमा झाले. दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना राज कॉर्नर येथे मराठा आंदोलकांना अडवण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. 

दुसरीकडे मोर चौक येथे दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये चार ते पाच मराठा आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

महाराष्ट्र व्हिडीओ

Cabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?
Cabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
Prakash Abitkar : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Cabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलंWind Power : धाराशिवमधील मेसाई जळगावात पवन चक्की ठेकेदारांची दहशतDevendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
Prakash Abitkar : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला; प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, राधानगरीला प्रथमच बहुमान! राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ
Maharashtra Cabinet expansion: देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
देवाभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
Shivendraraje Bhonsle : शिवेंद्रराजे भोसलेंना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान, सातारा विधानसभा मतदारसंघाला 25 वर्षानंतर मंत्रिपदाचा मान
भाऊसाहेब महाराजांचा वारसा जपला, आता उदयनराजेंची भक्कम साथ, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित
Embed widget