एक्स्प्लोर
Ganpati Special Trains | कोकण रेल्वेच्या Tejas आणि Vande Bharat मध्ये होणार मोदक वाटप!
आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणवासियांचा आपापल्या गावासाठीचा प्रवास आणखी गोड करण्याची तयारी आयआरसीटीसीने केली आहे. त्यानुसार, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोदकांचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेषतः राबवला जात आहे. गणेशोत्सव हा कोकणातील एक महत्त्वाचा सण असून, या काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या मूळ गावी प्रवास करतात. प्रवाशांना सुखकर आणि आनंददायी प्रवास अनुभवता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या मोदक वाटपामुळे प्रवाशांना उत्सवाचा गोडवा प्रवासातच अनुभवता येईल.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















