INS Vikrant kirit somaiya यांना अडचणीत आणणार ?, विक्रांतचा निधी निवडणुकीसाठी वापरला : Sanjay Raut
काल ईडीनं संजय राऊतांच्या जवळपास 11 कोटींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केल्यानंतर आज संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत फाईल ओपन करत किरीट सोमय्यांवर पलटवार केलाय.. युद्धनौका आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी गोळा केलेला निधी राजभवनात पोहोचलाच नाही. आरटीआय अंतर्गत राजभवनाकडून मिळालेल्या माहितीवर बोट ठेवत संजय राऊतांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहे.... आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेला पैसा किरीट सोमय्यांनी निवडणुकांसाठी आणि मुलगा नील सोमय्यांच्या कंपनीत वापरला असा आरोप राऊतांनी केला. महाराष्ट्र पोलीस याचा तपास करेलच, मात्र केंद्रीय तपासयंत्रणा पारदर्शी असतील तर त्यांनी देखील या प्रकरणाचा तपास करुन दाखवावा असं आव्हान राऊतांनी केलंय...





















