India Vs pak War : 'पीओके'त घुसणार, दहशतवाद्यांना संपवणार? शेवटचा घाव घालणार
India Vs pak War : 'पीओके'त घुसणार, दहशतवाद्यांना संपवणार? शेवटचा घाव घालणार
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताने घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan Economy Crisis) मोठ्या संकटात सापडली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात (Pakistan Stock Exchange) मोठी घसरण झाली आहे. अवघ्या काही दिवसांत पाकिस्तानच्या शेअर बाजाराला सुमारे 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात विविध पातळ्यांवर कठोर पावलं उचलली आहेत. द्विपक्षीय व्यापार थांबवणे, सिंधू पाणी वाटप करार निलंबित करणे, सार्क वीजा सवलतीचा लाभ रद्द करणे, पाकिस्तानी लष्करी सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश आणि अटारी वाघा सीमेवरील वाहतूक थांबवणे असे निर्णय भारताने घेतले.
Karachi Share Market : पाकिस्तानचा शेअर बाजार सातत्याने घसरला
भारताच्या या निर्णयांचा धक्का मात्र पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसल्याचं दिसून आलं. यामुळे कराची स्टॉक एक्सचेंजच्या KSE-100 निर्देशांकात सलग घसरण होत आहे. सोमवार, 22 एप्रिल रोजी निर्देशांक 1,405 अंकांनी घसरला. तर मंगळवारीही 1,100 अंकांची घसरण नोंदवली गेली. 24 एप्रिल रोजी बाजार सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच निर्देशांकात
2,485 अंकांची मोठी कोसळ झाली. दिवसअखेर तो 2,206 अंकांनी घसरून 1,15,019.81 वर बंद झाला. 29 एप्रिलपर्यंत या निर्देशांकात एकूण 5,494 अंकांची घसरण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















