एक्स्प्लोर
'I Love Muhammad' Controversy : लव्ह मोहम्मद v/s लव्ह महादेव Special Report
महाराष्ट्रामध्ये 'I Love Muhammad' लिहिलेल्या बॅनर्सचा एक नवा विषय समोर आला आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून हे लोण आता मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि भंडाऱ्यातही पोहोचले आहे. मौलाना तौफिक रजा यांच्या चिथावणीमुळे बरेलीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम युवक रस्त्यावर उतरले आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. या पोस्टर्समुळे हिंदुत्ववादी सक्रिय झाले आणि काही ठिकाणी 'I Love Mahadev' अशी पोस्टर्स झळकली. या वादाची सुरुवात उत्तर प्रदेशातील कानपूरमधून झाली, जिथे 'I Love Muhammad' पोस्टर्स लावल्याने वाद वाढला. पोलिसांनी पंचवीस मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल केले. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या ट्रेंडला विरोध करण्याचं कारण विचारलं. ते म्हणाले, "मै जिसमें मुझे मोहब्बत है और मुसलमान उस वक्त तक मुसलमान नहीं होता जब तक कि वो प्रॉफिट मोहम्मद को अल्लाह का आखिरी नबी रसूल ना माने और उस वक्त उसका ईमान मुकक्कम नहीं होता जब तक कि वो दुनिया में तमाम चीजों का प्रॉफिट मोहम्मद को चाहे।" मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही 'I Love Muhammad' बॅनर्स लावण्यात आले. कर्नाटकमधील दावणगेरीत बॅनर हटवण्यावरून राडा झाला. झाशीमध्ये 'I Love Mahadev' ने उत्तर देण्यात आले. आमदार नितेश राणे यांनी 'I Love Mahadev' असे ट्वीट करत हिंदुत्ववादी भूमिका मांडली. रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली. आमदार रोहित पवार यांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























