HSC Paper Leak : फक्त गणितच नाही, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचाही फुटला होता पेपर ABP Majha
बारावी परीक्षा पेपरफुटीच्या तपासात खळबळजनक माहिती समोर आलीये.. गणिताच्या पेपरसोबतच फिजिक्स आणि केमिस्ट्रीचाही पेपर फुटला होता... 27 फेब्रुवारीला फिजीक्स तर 1 मार्चला केमेस्ट्रीचा पेपर फुटल्याची माहिती क्राईम ब्रांचने दिलीेय. पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून कठोर पावलं उचलली जात असताना गणितासह तीन पेपर फुटल्याची माहिती तपासात समोर आलीये.. बारावी गणित पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. या चौकशीतून ही माहिती समोर आलीये... हे दोनही पेपर अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भांबरे एग्रीकल्चर ऍड सायन्स कॉलेजच्या स्टाफकडून फुटल्याची माहिती समोर आलीय..
या प्रकरणी महाविद्यालयातील व्यवस्थापन कर्मचारी आणि शिक्षकांचे मोबाईल गुन्हे शाखेने जप्त केले होते. त्यांच्या जप्त केलेल्या मोबाइलचा व्हॉट्सअॅप डेटामधून पेपर फुटल्याची माहिती समोर आलीये.























