Mahada Home : आमदारांना मुंबईत म्हाडाची घरं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
डोक्यावर छत असावं म्हणून सामान्य माणूस हक्काच्या घरासाठी आयुष्यभर आटापिटा करतो, तरीही त्याला घरं घेणं शक्य होत नाही. असं असताना राज्यातल्या 300 आमदारांना मात्र मुंबईत म्हाडाची घरं मिळणार आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी काल तशी घोषणा केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रावरून एडीआर संस्थेनं जो अहवाल प्रकाशित केला होता, त्यानुसार राज्यातील विधानसभेतले 93 टक्के म्हणजे 266 आमदार कोट्यधीश आहेत. असं असताना या कोट्यवधींची संपत्ती असलेल्या आमदारांना मुंबईतल्या गोरेगावात हजार ते बाराशे फुटाचं घर मिळणार आहे. आमदारांना मुंबईत घरं आणि घरांचं भाडं परवडत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. असं असेल तर घर घेणं सोडा, पण भाडंही परवडत नसलेल्या सामान्य माणसासाठी सरकार काय करणार आहे असा सवाल यामुळे उपस्थित होतोय......