Hingoli : हिंगोलीत पाण्यावर तरंगणारा बाबा, अंनिस तरंगणाऱ्या बाबाची पोलखोल करणार : ABP Majha
गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आलाय... हिंगोलीतील हा बाबा हात पाय न हलवता पाण्यावर तरंगतोय. अनेक जण याला चमत्कार समजून बाबाच्या दर्शनाला येतायत. दुर्गसावंगीतल्या सिरसम येथे भागवत सप्ताह सुरू आहे.. हातपाय न हलवता पाण्यावर तरंगू शकतो असा दावा या महाराजांनी केलाय आणि हे पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती... 14 महिने उपवास आणि देवाचं नामस्मरण केल्यानं हे शक्य झाल्याचा दावा संबंधित बाबांनी केलाय.... दरम्यान या प्रकरणावर अंनिसने मात्र आक्षेप घेतला आहे.. अंनिस आज या बाबाची पोलखोल केली जाणार आहे.. विहिरीतला हा प्रकार नेमका काय आहे हे लोकांना दाखवून दिलं जाईल असं आव्हान अंनिसने दिलंय...





















