Kolhapur Student : वर्गात जनावरांचा गोठा, विद्यार्थी रस्त्यावर ABP Majha
कोरोनामध्ये वाटेत कायमच विघ्न आले्लया शाला यावर्षी सुदैवानं निर्विघ्नपणे सुरू झाल्या मात्र कोल्हापुरच्या आजऱ्यात एका शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोरची विघ्नं काही संपायचं नाव घेत नाहीयेत... आजरा इथल्या एका शाळेचं रुपांतर चक्क गोठ्यात झालं आणि विद्यार्थी मात्र रस्त्यावर आलेत. खासगी शिक्षण संस्था चालक आणि जमिनीचा मालक यांच्यात सध्या वाद सुरू आहे.. आणि हा वाद इतका टोकाला गेला की जमीन मालकाने जनावरं आणून थेट वर्गातच बांधली आहेत... त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवून शिकवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे... पावसाळा सुरू झाल्यानं उघड्यावर शिकवणं आता जवळपास अशक्य होणार आहे.. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय.























