ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 25 May 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 25 May 2024 : Maharashtra News
निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५८ जागांवर मतदान सुरू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि गांधी कुटुंबीयांनी बजावला हक्क, सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८२ टक्के मतदान
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, भाजप उमेदवार बांसुरी स्वराज यांनी सकाळी सात वाजताच केलं मतदान, कपिल देव आणि गौतम गंभीर यांनीही बजावला हक्क
मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
काँग्रेस पक्ष देशविरोधी, राजकारणात येऊ पाहणारी एक संपूर्ण पिढी त्यांनी संपवली, एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात कंगना रनौतची टीका
पुण्यापाठोपाठ नागपुरात मद्यधुंद कारचालकानं तिघांना उडवलं... ३ महिन्याच्या बाळाची प्रकृती गंभीर...कारचालकासह दोघे पोलिसांच्या ताब्यात.
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप