Hasan Mushrif Kolhapur : कागलमध्ये हसन मुश्रीफांचं उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्तिप्रदर्शन
Hasan Mushrif Kolhapur : कागलमध्ये हसन मुश्रीफांचं उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्तिप्रदर्शन
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आज कागल विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी आज वसुबारस असल्याने हसन मुश्रीफ यांनी गोमातेचे विधिवत पूजन करत आरतीही केलीये. यावेळी मुश्रीफ यांनी गोमातेचा विजय असो घोषणाही दिल्यात . कागल येथील कैदी चौकात झालेल्या या कार्यक्रमात हसनमुश्रीफ यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा तर दिल्यात मात्र महायुतीचे सरकार सत्तेवर येईल असे त्यांनी म्हटल आहे. तर आजची रॅली ही विजयाची रॅली ठरेल आणि विरोधक म्हणजे पाण्यावरील बुडबुडे आहे अशी टीका देखील त्यांनी केली..
महत्त्वाच्या बातम्या























