Indigo Flight Delayed : गोवा- दिल्ली इंडिगो फ्लाईट 12 तास उशिराने, प्रवाशांचा संताप समोर
गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटला १२ तास उशीर झाला.. त्यामुळे संतापलेले प्रवासी एअरक्राफ्ट पार्किंगमध्ये बसले आणि तिथेच जमिनीवर बसून जेवण केलं.. या प्रकरणावर इंडिगोनं प्रवाशांची माफी मागितली आहे.. काल गोव्याहून सकाळी १०.४५ मिनिटांनी उड्डाण घेणारी इंडिगोची फ्लाईट रात्री १० वाजून ६ मिनिटांनी निघाली...दिल्लीत दाट धुक्यांमुळे विमान १२ तास उशिरा निघालं.. गोव्याहून फ्लाईट मुंबईला उतरवण्यात आलं.. आणि त्यामुळे प्रवाशांचा संताप आणखी वाढला... प्रवाशांनी विमानाबाहेर येत जमिनीवरच जेवण केलं.. आणि अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले... दरम्यान धुक्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं इंडिगोनं म्हंटलंय.. शिवाय मनस्ताप झालेल्या प्रवाशांची माफीही मागितलीए





















