Girish Mahajan vs Sanjay Raut : 'दलाली'वरून ऊत ; महाजन विरुद्ध राऊत
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर विखारी टीका केली आहे। गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल आहेत असा निशाणा राऊतांनी झाडला आहे। तर ठाकरेंच्या काळामध्ये चौकशी लागल्यावर महाजन पक्ष सोडणार होते। त्यामुळे सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील असं राऊतांनी म्हटलंय। तर संजय राऊतांएवढी दलाली आजपर्यंत कोणी केली नसेल। संजय राऊतांच्या दलालीमुळेच शिवसेनेचं नुकसान झाल्याचं जोरदार प्रत्युत्तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। जो भाग सात ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं त्या जमीनदोस्त देशद्रोहीच्या मार्गावर आहे। त्या माणसाच्या बडबडींमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। हातात पोलिस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजूतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागताहेत ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरदपासाहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्या मधली जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटता आजपर्यंत कोणी केली नसते.























