एक्स्प्लोर
Electricity Load Shedding : राज्यात अघोषित भारनियमन, कोणकोणत्या भागात सुरू आहे भारनियमन?
कोळसाटंचाईमुळे राज्यात झालेल्या विजेच्या टंचाईनं राज्यातल्या अनेक भागांना अघोषित भारनिमयमनाचा शॉक सहन करावा लागतोय. राज्यातल्या 24 हजार 200 पैकी 1300 संचयकांवर तीन तासांपर्यंतचं भारनियमन सुरू झालंय. वीजगळती अधिक असलेल्या भागांत सध्या भारनियमन सुरू आह़े. वीजेअभावी ग्रामीण भागांत पिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आह़े त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना याच्या तीव्र झळा बसतायत. तब्बल दहा वर्षांनंतर राज्यातल्या अनेक भागांना भारनियमनाचा शॉक बसलाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















