Shinde Fadnavis Pawar Full PC: लाठीमारप्रकरणी फडणवीसांची माफी, सरकार मराठा समाजासोबत,शिंदेंची ग्वाही
Shinde Fadnavis Pawar Full PC: लाठीमारप्रकरणी फडणवीसांची माफी, सरकार मराठा समाजासोबत,शिंदेंची ग्वाही
जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी आणि एकूणच मराठा आरक्षणप्रकरणी सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. लाठीमार झाल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिनशर्त माफी मागितली असून, लाठीमार करणाऱ्यांची चौकशी करून, कडक कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. त्याचप्रमाणे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलंय. तसेच राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचा निर्वाळाही शिंदेंनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आम्ही तिघांनी लाठीमाराचा आदेश दिला, हे सिद्ध करून दाखवा, ताबडतोब राजकारण सोडून देऊ, असं वक्तव्य केलंय
मराठा आरक्षणासंदर्भात आज मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक अखेर संपली आहे. या बैठकीमुळे जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना आता वेग आला आहे या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.