Eknath Khadse on Exit Poll 2024 : फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या
Eknath Khadse on Exit Poll 2024 : फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या
Eknath Khadse on Exit Poll : एक्झिट पोलचा (Exit Poll) निकाल पाहता 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे असल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसतय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे खडसे म्हणाले.
साडेतीनशे जागांचा टप्पा पार होईल असा विश्वास
लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी माझा आणि सी व्होटर्सचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामं केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोलचां निकाल पाहता साडेतीनशे वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत असंही खडसे म्हणाले.