Babasaheb Ambedkar Birth Anniversary: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती! महामानवास विनंम्र अभिवादन!
Dr Ambedkar Jayanti 2024 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांच्या 133 व्या जयंती निमित्याने अवघ्या देशभरात नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेय. त्याच अनुषंगाने नागपुरातील (Nagpur News) दीक्षाभूमीवर देखील काल मध्यरात्री पासून शेकडो बौद्ध अनुयायांचा जनसागर महामानवाला अभिवादन करण्यासाठी उसळाला असल्याचे चित्र आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आज दीक्षाभूमीवर भेट देत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी देशातील सर्व नागरिक आणि बौद्ध अनुयायांना जयंती निमित्य शुभेच्छा दिल्या.























