एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 5PM Top Headlines 03 JULY 2025 एबीपी माझा 5 च्या हेडलाईन्स

दिशा सॅलियन प्रकरणात मुंबई पोलिसांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये हत्या आणि बलात्काराचा कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर संजय राऊत यांनी फडणवीस आणि नितेश राणेंनी माफी मागावी अशी मागणी केली. यावर नितेश राणे यांनी दिशाच्या वडिलांनी स्वतः आदित्य ठाकरेंवर आरोप केल्याचे विधान केले. तर, "ज्याच्याशी काही संबंधच नाही, त्यावर बोलणार नाही" असे आदित्य ठाकरेंनी उत्तर दिले. राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये ५ जुलैच्या विजय मेळाव्याची रूपरेषा माधांच्या हाती सोपवण्यात आली आहे. व्यासपीठावर राज आणि उद्धव ठाकरेंसोबत इतर पक्षांचेही पक्षाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता तगडं प्लॅनिंग करण्यात आले आहे. नाशिकमध्ये मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या भाजपा प्रवेशाला गुन्हा दाखल झाल्याने ब्रेक लागला आहे. दोघांच्या जामिनावर ५ जुलैला सुनावणी होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची नाशिकमध्ये नामुष्की झाली असून, अवघ्या चार दिवसात मामा राजवाडेंची महानगर प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे. प्रथमेश गीतेंकडे पदभार सोपवण्यात आला आहे. महायुतीत महामंडळांचं वाटप जवळपास पूर्ण झाले असून, महापालिका निवडणुकीपूर्वी मंत्रीपद हुकलेल्या आमदारांना अध्यक्षपद मिळणार आहे. मुंबई महानगर परिसरातील महामंडळांसाठी भाजपा आणि शिवसेनेतरची खेच सुरू आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या कामकाजाची पत्रिका चक्क इंग्रजीत असल्याने मुनगंटीवारांनी संताप व्यक्त केला. इंग्रजी हवी असलेल्यांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा असे ते कडाडले. उमेशच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाकेंनी गिरगाव सोपाटीवर समुद्रात आंदोलन केले, त्यांना कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीविरोधात मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध केला. हा बंद भाजपने आयोजित केल्याचा मनसेचा आरोप आहे. ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराने मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून समर करण्यात आले आणि दुकानदाराचा कान धरून माफीनामा घेण्यात आला. पुण्यातील कोंढव्यात कुरियर बॉयच्या वेशात आलेल्या नराधमाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून, दोन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. राज्यात एक लाख ब्याऐंशी हजार बालके कुपोषित असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. मुंबई उपनगरात सर्वाधिक सोळा हजार तीनशे चौवेचाळीस कुपोषित बालके आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कुपोषणात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, तर साताऱ्यातील कण्हेर धरणातून सत्तावीस क्युसेकने विसर्ग सुरू आहे. नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलार्ट जारी करण्यात आला आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील सोनालेल्या रेकळपाड्यात नदीवर पूल नसल्याने तलावावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे, तर जुग्रेपाड्यात बंधाऱ्याच्या पाण्यातून विद्यार्थ्यांची कसरत सुरू आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget