एक्स्प्लोर
Sambhajinagar : योगेश्वर English School मध्ये विद्यार्थ्यांची कोंडी, अनेक ठिकाणी विद्यार्थी कागदावरच
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहातील धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. योगेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, महाल पिंपरी, वरुडकाजी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील या शाळेत अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. योजनेनुसार विद्यार्थ्यांची मंजूर संख्या शंभर असताना, कागदावर अडुसष्ठ आणि प्रत्यक्षात शाळेत केवळ पंचवीस विद्यार्थी उपस्थित होते. वसतिगृहाच्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरशः कोमडण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याला चोवीस चौरस फूट जागा मिळणे आवश्यक असताना, एकाच खोलीत सतरा विद्यार्थी राहत असल्याचे दिसून आले. एका खाटेवर दोन विद्यार्थी झोपत होते. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण बनवण्याऐवजी बांधकामाचे साहित्य, सिमेंट आणि लोखंडी तारा ठेवलेल्या आढळल्या. यासाठी स्वतंत्र किचन असणे हा नियम आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी ऑडिट करून फोटो प्रस्तावाला जोडले असले तरी, प्रत्यक्षातील स्थिती वेगळी आहे. कॉम्प्युटर लॅबमध्ये वीसपैकी केवळ एक कॉम्प्युटर सुरू होता आणि त्यावरही धूळ साचलेली होती. संस्थाचालक योगेश अंभोरे यांनी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत आणि सुविधांबाबत दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळली. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांबाबत प्रश्न विचारले असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. ही परिस्थिती अनुदानित वसतिगृहांमधील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















