HIngoli:हिंगोलीच्या कयाधू तीरावर संत नामदेवांच्या 751व्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक दाखल
भागवत धर्माची पताका साता समुद्रापार पोहचविणारे ,महाराष्ट्रातील वारकरी संत कवी, संत नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आज लाखोंचा जणसागर नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळी नरसी गावी दाखल झाला आहे. जन्मशताब्दी सोहळा निमित्त मागील पंधरा दिवसापासून नामदेवाच्या जन्मस्थळी विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आज या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला, भक्तिमय संगीताने व टाळ मृदुंगाच्या गजराने नरसी परिसर दुमदुमून गेला. याचे खास विहंगम दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी आम्ही ड्रोन कॅमेरा तून टिपले आहे. नामदेवाच्या जन्मस्थळी पंजाब, हरियाणा, छत्तीसगड सह ईतरही राज्यातून भाविक मोठ्या संख्येने नरसी येथे दाखल होत असतात. नामदेव महाराज हे मराठी भाषेतील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होतें. त्यांनी वज्र भाषेमध्ये ही काव्य रचली, शिखांच्या गुरु ग्रंथसहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाब मधील मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत, नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीच्या तीरावर आहे. संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2019 मध्ये झाला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थांच्या विकासासाठी प्रयत्न केले. नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला. त्यांनी 3 जुलै 1350 ला त्यांनी संजीवन समाधी घेतली.