MHADA Home : धोकादायक इमारतींचा विकास म्हाडाच करेल, सरकारकडून शासन आदेश जारी : ABP Majha
जे मुंबईकर धोकादायक इमारतींमध्ये राहतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी.... मालक आणि भाडेकरूंच्या वादात धोकादायक इमारतींमधील भाडेकरूंना जीव टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे यापुढे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मालकाने सहा महिन्यांत सादर न केल्यास तो पुनर्विकास म्हाडाने भाडेकरूंच्या नियोजित गृहनिर्माण सोसायटीकडून करून घेण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाकडून जारी करण्यात आलेत. आणि गृहनिर्माण सोसायटीलाही पुनर्विकासाचा प्रस्ताव देता आला नाही, तर म्हाडाच या इमारतींचा पुनर्विकास करेल. राज्य सरकारने या आदेशविषयीचा शासन निर्णय जारी केलाय. तसं झाल्यास मालकाला जमिनीच्या किमतीपोटी रेडिरेकनरच्या दरानुसार २५ टक्के रक्कम किंवा सेलेबल इमारतीमधील १५ टक्के बांधकाम क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल ते दिले जाईल.























