Shreyas Iyer Century : श्रेयस अय्यर…मुंबई क्रिकेटच्या खाणीतला नवा हिरा
तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल किंवा त्यातल्या त्यात श्रेयस अय्यरचे चाहते असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी खास असणारेय. कारण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळताना दमदार कामगिरी, आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचं यशस्वी नेतृत्व हे टप्पे पार करणाऱ्या श्रेयसने नवीन रेकॅार्ड केलाय. काही दिवसांपूर्वीच श्रेयस अय्यर संघातील सहकारी मोहम्मद सिराजला पत्त्यांची जादू दाखवतानाचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला होता. हाच तो पत्त्यांची जादू दाखवणारा क्रिकेटमध्ये कमाल करून गेलाय. त्याने इतिहास रचला आहे. कसोटी पदार्पणातचं श्रेयस अय्यरनं शतक झळकावलं आहे. एवढंच काय तर, न्यूझीलंड विरोधात पदार्पणात शतक झळकवणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एकंदरीतच याच कामगिरीचा आढावा घेणारा हा व्हिडीओ






















