Coal Scam : कोळसा घोटाळा प्रकरणात शिक्षा सुनावणार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोजकुमार जैस्वाल दोषी
कोळसा घोटाळा प्रकरणी गेल्या आठवड्यात दिल्लीच्या विशेष कोर्टाने माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायवेट लिमिटेडचे माजी संचालक मनोजकुमार जैस्वाल यांच्यासह काही जणांना दोषी ठरवलं होतं. या प्रकरणी आज दिल्ली विशेष कोर्ट त्यांना शिक्षा सुनावणार आहे. हे प्रकरण २००७ मधील होतं. छत्तीसगडमधील फत्तेपूरच्या कोळसा खाणीच्या वाटपासाठी तत्कालीन राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांना पत्र लिहिलं होतं आणि जेएलडी एनर्जी लिमिटेड कंपनीला कोळसा खाण देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे जेएलडी एनर्जीने कोल ब्लॉक घेण्यापूर्वी आधी कोल ब्लॉक घेतल्याची माहिती लपविली होती.























