'संभाजीराजेंसोबत ओढूनताणून नातं निर्माण केलं नाही',मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला
सारथी संस्थेच्या कोल्हापुरातील उपकेंद्राचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं. राजाराम महाविद्यालय परिसरात झालेल्या उद्घाटन सोहळ्याला श्रीमंत शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. शाहू जयंतीच्या निमित्ताने करवीरनगरीत सुरू होत असलेल्या या उपकेंद्राला सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीय. मराठा आरक्षणाचा लढा सुरूच राहील मात्र त्याबरोबरच इतर प्रश्न देखील सोडवणे गरजेचे आहे. त्यासाठी सारथी सक्षम झाली पाहिजे अस असं मत यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं.



















