CM Thackeray यांचा Kalpita Pimple शी फोनवरून संवाद, पिंपळेंच्या कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
Thane : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी फोनवरुन संवाद, कल्पिता पिंपळे यांच्या कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, सरकार खंबीरपणे पाठीशी, मुख्यमंत्र्यांची कल्पिता पिंपळे यांना ग्वाही
ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.























