CM Eknath Shinde Full PC : हजार टँकर भाड्यानं घेऊन मुंबईतले सगळे रस्ते धुण्याचे आदेश - मुख्यमंत्री
CM Eknath Shinde Full PC : हजार टँकर भाड्यानं घेऊन मुंबईतले सगळे रस्ते धुण्याचे आदेश - मुख्यमंत्री शिंदेमुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी, कलानगर फ्लायओव्हर ते जुहू तारा रोडपर्यंत पाहणी.
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या महापालिकेच्या (BMC) स्वच्छता कामांची... धूळ आणि वाढत्या प्रदूषणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण (Mumbai Pollution) नियंत्रणात आणण्याचे आदेश यंत्रणाना दिले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यकता भासल्यास दुबईतील कंपनीशी करू कृत्रीम पाऊस पाडू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल उपस्थित होते. वांद्र्यातील कलानगर उड्डाणपुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जुहू तारा रस्त्यापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंनी स्वच्छतेची पाहणी केली.या वेळी वांद्रे पूर्व,पश्चिम भागातील नागरिकांशी संवाद साधला