CM Eknath Shinde Exclusive : लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर; मुख्यमंत्री शिंदे यांची विशेष मुलाखत
CM Eknath Shinde Exclusive : लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर; मुख्यमंत्री शिंदे यांची विशेष मुलाखत पुरोगामी महाराष्ट्र सगळ्यांनी पाहिलाय पण आजकाल खाल्यचा शब्दातले आरोप प्रत्यारोप होत आहे. कमरेखालचे वार या सगळया गोष्टी लोकांना नाही आवडत. लोकांना विकास हवा. आज जे काही आरोप होतात, खरं तरं सत्ता गेल्यानंतर काही लोकं सैरभैर झालेत. त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलंय. पोरटोरांच्यावर मी बोलतं नाही. त्यांचं वय किती, त्याच्या कामाचा अनुभव, पक्षासाठी किती योगदान आहे, आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पक्षाचं काम केलेले रक्ताच पाणी केलेले लोक आहेत. लोकांकडून पाया पडून घेणं, लोकांना आवडतं नाही. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. परंतु हे सरंजामदारपणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात. यामुळेच हा इतिहास घडला आहे,




















