City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 29 जुलै 2024 : ABP Majha
वाशिममधील सोनल धरण ओव्हरफ्लो, झाडं झुडपं वाढल्यानं धरणाच्या भिंतीला तडे जाण्याची नागरिंमध्ये चिंता, तात्काळ झाडांची छाटणी करण्याची मागणी
धुळ्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे जल प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ, साक्री तालुक्यात देखील दमदार पाऊस झाल्याने कान नदीवरील जामखेडी, मालनगाव प्रकल्प ओव्हरफ्लो
भंडाऱ्यात पावसाने काहीशी उसंत घेतल्याने गोसीखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग काहीसा कमी, सध्या धरणाचे ३३ दरवाजे एक मिटरने उघडले असून, अडीच लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु.
पालघर जिल्ह्यात पावसाने पूर्णताह उसंत घेतल्याने धामणी धरणाचे तिन्ही गेट पुन्हा बंद, सूर्या नदीचा पुरही ओसरला.
खैरी धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्रवाहात वाहून गेलेला कारंजा येथील युवक अद्याप बेपत्ता, अजूनही शोध सुरुच.
नंदुरबार शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाची संतत धार सुरूच, त्यामुळे शेतात पाणी साचल्याने पिकं खराब होण्याचा धोका.




















