City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 02 ऑगस्ट 2024 : ABP Majha
पूजा खेडकरने IAS होण्यासाठी सात वेगवेगळी नाव धारण केली,आई, वडिलांच्या नावात बदल करून सात वेळा भरले अर्ज, दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती.
पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, पूजा खेडकर नातेवाईकांच्या मदतीनं परराज्यात लपल्याची माहिती, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून शोध सुरु .
वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा झालाय दाखल.
पुण्यातील आणखी एका आयएएस अधिकाऱ्याचं पद धोक्यात, बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरुन आणि युपीएससीला खोटी माहिती देऊन पुण्याच्या अमोल आवटे यांनी पद मिळवल्याचा आयटीआर कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाण्याची शक्यता, यासंदर्भात पुणे पोलीस न्यायलयाकडे मागणी करणार असल्याची माहिती.
अकोल्यात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात नऊ महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू ,वडील आणि ५ वर्षीय मुलगी जखमी, दुचाकीला धडक दिल्यानंतर कारचालक पसार
औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराच्या मुद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान