City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 14 September 2024 : ABP Majha
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात,मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार असल्याची माहिती.
विदर्भातील ६२ पैकी २९ जागांवर महाविकास आघाडीचं गणित सुटल्यात जमा आहे. या २९ जागांवर मविआतल्या एकेका पक्षानेच दावा केल्यामुळे हा प्रश्न निकाली निघाल्याचं सांगितलं जातंय.
विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी, पितृपक्षानंतर भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता.
मुंबईतील मतदारसंघांसाठी भाजपची मोर्चेबांधणी, प्रत्येक विधानसभा अध्यक्षासहित समन्वयक आणि प्रभारींकडून मतदारसंघाचा आढावा घेत व्यूहरचना आखली जाणार.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, लालबागसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देणार, तर फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून आढावा, विविध आघाड्यासोबत भूपेंद्र यादव यांची चर्चा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा मास्टर स्ट्रोक खेळणार , 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान विधानसभेचं एक दिवसीय अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत. यामुळे मराठवाड्य़ातील मराठा समाज हा कुणबी होऊन ओबीसी मध्ये जाऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर. शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान करणार उद्घाटन, तसंच एसपी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा.